जालना जिल्ह्यात भिख्खू संघाचे चिवर अंगावर परिधान करुन बनावट भन्ते म्हणून फिरत असलेले कश्यपली यांच्या विरोधात गेल्या काही दिवसापुर्वीच भिख्खू संघ आणि बौध्द अनुयायांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर आता पोलीस प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती भन्ते शिवली शाक्यपुत्र यांनी रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दिलीय.
भिख्ख संघाच्या नियमाप्रमाणे बौध्द धम्म हा अहिंसावादी असून शांतीचा मार्ग दाखविणारा धम्म आहे. पंरतु, कश्यपली हे हिंसेचे समर्थन करीत असून त्यांनी तरुणांना सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून भडकवित असून दोन समाजात तेड निर्माण करीत असल्याचे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन देण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर कारवाई करुन भिख्खू संघाची होणारी बदनामी थांबविण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अधिकारी हरिभाऊ राठोड यांनी भिख्खू संघाच्या नियमावलीची माहिती मागीतली असून त्यासाठी भन्ते शिवली शाक्यपुत्र यांना बोलावून घेत सविस्तर माहिती घेतली. यावेळी अरुण सरदार, वैशाली सरदार, महेंद्र रत्नपारखे, मुरली बोबडे, राहुल रत्नपारखे यांच्यासह इतरांचीही उपस्थिती होती.