जालना तालुक्यातील रेवगाव येथील एका महिलेचा विनयभंग करुन बांधकाम अडविणार्या आणि कुटुंबीयाला मारहाण करणार्या संशयीत आरोपीला गुरुवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी अटक करुन त्याला दुपारी 2 वाजेच्या सुमारास माननीय न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
रेवगाव येथील एका महिलेचे बांधकाम सुरु असतांना त्या कामावर जावून काम आडवून महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन कुटुंबीयांनाही मारहाण केली होती असे तक्रारीत नमुद आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्ञानदेव पांडुरंग कदम, परमेश्वर ज्ञानदेव कदम यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी बांधकाम आडवून कुटुंबीयांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. तसेच महिलेचा विनयभंग करुन कुटुंबीयाला त्रास दिला होता. असे तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे सदरील महिलेने तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यातील परमेश्वर ज्ञानदेव कदम याला अटक करण्यात आले असून आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.




















