जालना तालुक्यातील जालना ते अंबड रोडवरील टोलनाक्याजवळ तालुका जालना पोलीसांनी कारवाई करुन गुटख्याने भरलेली ट्रक जप्त केली असून अन्न व औषधी प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी पत्र दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी गुरुवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता दिलीय.
जालना ते अंबड रोडवर गुटखा घेऊन जाणार्या ट्रकची माहिती तालुका जालना पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सापळा लावून या ट्रकची तपासणी केली. दरम्यान त्यात गुटखा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीसांनी सदरील ट्रक जप्त केला असून ट्रक मधील गुटख्याची मोजदाद करण्यासाठी तसेच पुढील कारवाई करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाला पत्र दिलंय. मात्र अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकार्यांनी दुपारी 3 वाजेपर्यंत तालुका जालना पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची भेट किंवा तक्रार दिली नाही. त्यामुळे अद्याप गुटख्या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.




















