चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नजीक पांगरी शिवारातून शेतात ठेवलेल्या इलेक्ट्रीक मोटार सह इतर साहित्याची चोरी केल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात सोमवार दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी एकनाथ लक्ष्मणराव कान्हेरे की, ते त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना पत्राच्या घरात ठेवलेले इलेक्ट्रीक मोटार आणि इतर शेती उपयोगी साहित्य दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी शेजारचे लक्ष्मण नानासाहेब पवार यांच्याकडे त्या संदर्भात विचारपुस करण्यासाठी गेले असता त्यांना चोरी गेलेले साहित्य दिसून आले. त्यामुळे त्यांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुमारे 40 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात लक्ष्मण नानासाहेब पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास चंदनझीरा पोलीस करीत आहेत.