जालना – जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी अवैध्यरित्या गुटखा, तंबाखु, मावा, जर्दा, खर्रा आणि सुटट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणा-या तसेच तंबाखु नियंत्रण कायदयाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व पानटपरीधारकांवर कोटपा २००३ कायदा अंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले.
यामध्ये कायदयाअंतर्गत विविध कलमानुसार एकुण १७ पानटप-यांवर कारवाई करुन ४६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई संपुर्ण जिल्हाभरात यापुढेही जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे, तरी पानटपरी धारकांनी अवैध्यरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करु नये.
ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों एस.पी. तनपुरे, रमेश काळे व सौरभ मुळे राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्याद्वारे करण्यात आली.