जालना (प्रतिनिधी) – जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जालना विधानसभेत आजपर्यंत चार वेळा शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. जालना नगर परिषदेतही गेली अनेक वर्षे शिवसेनेचाच झेंडा होता. त्यामुळे या मतदार संघात पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. जालना मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेला काँग्रेसला सुटल्याने जालना विधानसभेची जागा शिवसेनेला सोडवून घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
भास्कर अंबेकर हे गेली ३८ वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत.
पक्षाच्या फुटी नंतरही ते शिवसेनेतच राहिले. अनेकविध पक्षांनी त्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊ केली असतानाही पक्षनिष्ठा न सोडता त्यांनी शिवसेनेतच काम केले. शिवसेनेचे शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख व गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संघटना मजबूत केली.जालना नगरपरिषदेमध्ये अनेकवेळा नगरसेवक, दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत
त्यांनी अनेक विकास कामे केल्याने शहरवासीयांना त्यांची कारकीर्द कायम संस्मरणीय आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या दृष्टीमुळे ते लोकप्रिय आहेत. जालना बाजार समितीतही ते सोळा वर्षे संचालक व उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले .खरंतर त्यांना खूप वर्षांपूर्वीच विधानसभेची संधी मिळायला पाहिजे होती. आता तरी जालना विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी. अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळांने केली. या शिष्टमंडळात तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, माजी पं. स. सभापती मुरली थेटे, माजी जि.प. सभापती देवनाथ जाधव, विधानसभा संघटक दीपक रणनवरे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, उपतालुका प्रमुख प्रभाकर उगले, हरिभाऊ शेळके, प्रभाकर घडलिंग, अंकुशराव राजेजाधव, माजी जि.प.सदस्य अशोक खलसे, युवा सेनेचे संदीप मगर, परमेश्वर डोंगरे, संतोष खरात, बळीराम ढवळे, सुरेश वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.