देशातील प्रसिद्ध उद्योपती तथा सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत असलेले रतन टाटा यांचं दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे पूर्ण देशावर शोककळा पसरली. रतन टाटा यांनी 86 व्या वर्षी मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवार दि. 6 ऑक्टोबर 2024 रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसर्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत प्रकृतीची माहिती दिली होती.
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, दानशुर म्हणून रतन टाटा सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तबगारीतून प्रत्येकाच्या मनात एक घर केलं आहे. आणि याच घरातून आज त्यांनी निरोप घेतल्याने प्रत्येक भारतीयांच्या र्हदयाच्या घराचा कप्पा रिकामा झालाय. आजपर्यत अनेक उद्योगपती होऊन गेले, परंतु, रतन टाटा यांच्यासारखा उद्योगपती होणे नाही. रुग्णालयात अॅडमीट केल्यानंतर तिसर्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने देशाचं मोठं नुकसान झालंय. छोट्या-मोठ्या पासून सर्वांनाच या बातमीने धक्का बसला. त्यांची प्रत्येक भारतीयासोबत भेट झाली नसली तरी, त्यांची प्रतिमा प्रत्येक भारतीयांच्या मनात होती आणि राहील. देशातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी रतन टाटा यांच्या जाण्याचं दुखः व्यक्त केलंय. प्रत्येकांनी सोशल मिडीयाच्या स्टेटसला टाकून त्यांना श्रध्दांजली दिली आहे, परंतु, सर्वत्र हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे. उद्योगपती बद्दल प्रत्येक भारतीयांना दुखः होत असलेले हे पहिलाच उद्योगपती आहे.
रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
रतन टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणार्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचार्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचार्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणार्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांची कारकीर्द
– जन्म – 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष
– 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू
1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं
– चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली
– 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)
– एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली
– 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली
– 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला
– मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी
– नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन
– रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.