जालना शहरातील दुर्गा माता मंदीर परिसरात भरणार्या यात्रेत एकाच दिवशी 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागीण्यावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी घडली. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात आत चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
या प्रकरणी यशोदीप नगर येथील सविता सचीन पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, त्या त्यांच्या मैत्रीणीसोबत दुर्गामाता यात्रेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरुन काही अनोळखी महिलांनी वारंवार चकरा मारल्या, त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंळसुत्र कापून चोरुन नेलं. तसेच चनेगाव येथील योगीता अनील काफरे, उटवद येथील अनिता प्रमोद कोरडे, काद्राबाद येथील माया संजय चौधरी यांच्या गळ्यातील देखील सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. 4 महिलांच्या गळ्यातील सुमारे 78 हजार रुपये किंमतीचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.