जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हे मध्यवती ठिकाणी असून या ठाण्याला चार पोलीस चोकी संलग्नित आहेत. या पोलीस ठाण्या अंतर्गत असलेली लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच लाख इतकी आहे. शहरातील सर्वसामान्य जनता आपले प्रश्न घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येत असतात परंतु जागेच्या अभावामुळे पार्किंगची समस्या निर्माण होते.पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या व पोलीस ठाण्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या संख्येचा गांभीर्याने विचार करून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या जुन्या वास्तूच्या जागी नवीन इमारतीचे बांधकाम करावे,
यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरामध्ये पोलीस ठाण्याला नवीन जागा उपलब्ध करून तेथे पोलिसांसाठी नवीन इमारतीचे निर्माण करावे, अशी मागणीही य शिष्टमंडळाने आ. कैलास गोरंटयाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.