जालना – गेल्या 27 वर्षापासून भाजप सोबत असलेले सुनिल बापू आर्दड यांनी आज घनसावंगी आणि जालना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान सतिष घाडगे हे देखील घनसावंगीमधून निवडणूक लढविणार आहेत. परंतु, सतिष घाडगे हे जालना जिल्ह्यातले नाहीत, त्यामुळे त्यांना मी राजकीय स्पर्धक मानत नाही, मी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे. अशी माहिती गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुनिल आर्दड यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेळ प्रसंगी आपण जालना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात देखील उतरणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगीतलं.
घनसावंगी मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली. जालना आणि घनसावंगी तालुक्यात भाजपे मोठे काम आम्ही केलं असून मजबूत संघटन उभा केलंय, त्यामुळे आमची दावेदारी आहे. शिवाय जालना विधानसभा मतदार संघ हा महायुतीमधील शिवसेनेला सुटला आहे. परंतु, त्यांचं काम कीती दिवस करायचं असा प्रश्न उपस्थित करुन काही उद्योक, व्यापारी आणि जनता यांच्या आग्रहाखातर जालना विधानभा मतदार संघातून देखील निवडणूक लढविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविलाय. घनसावंगीमधील सतिष घाडगे हे दिड वर्षापुर्वी भाजप मध्ये आले आहेत, ते उद्योजक आहेत, त्यांचा घनसावंगीत उद्योग चांगला चालु आहे. त्यांना शुभेच्छा देता असेही आर्दड यांनी म्हटलंय.