भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत सतीश घाटगे पाटील यांनी जनता आणि कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटपर्यंत त्यांना माघार घेण्यासाठी महायुतीतील मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आलेनाही. सतीश घाटगे पाटील यांनी जनतेला दिलेल्या शब्दांनुसार आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत जनतेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून सतीश घाटगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार जालना, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावांचा प्रचार दौरा सुरू केला आहे. हा प्रचार दौरा परिवर्तन यात्रा म्हणून सतीश घाटगे करत आहेत. प्रत्येक गावात त्यांना सर्व समाज घटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाजातून आणि विविध सामाजिक संघटनांचा त्यांना जाहीर पाठिंबा मिळत आहेत.
घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आली आहे. मात्र ह्या वेळेस अपक्ष उमेदवार विरुद्ध प्रमुख राजकीय पक्ष असे असे चित्र तयार झाले आहे. सतीश घाटगे यांनी कुठल्याही संविधानिक पदावर नसताना केलेल्या विकास कामामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा विकसनशील नेतृत्व म्हणून तयार झाली आहे. याच गोष्टीमुळे सतीश घाटगे यांना प्रत्येक गावागावातून प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे हिकमत उढाण आणि राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचे टेन्शन वाढले आहे.
निवडणुकीत सर्वच उमेदवार आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. त्याप्रमाणे सतीश घाटगे यांनी आपला जाहीरनामा सार्वत्रिक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या जाहीरनामा हा वचननामा म्हणून त्यांनी प्रसिद्ध केला असून जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द पाळणार अशी हमी त्यांनी जनतेला दिली आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 25 वर्षापासून प्रलंबित असलेले दुष्काळी गावांचे रस्ते, पाणी, वीज , बस सेवा या प्रमुख गोष्टींचा समावेश आहे. त्यांचे विकासाचे विजन घनसावंगी मतदारसंघातील प्रत्येक जनतेमध्ये हिट झाले आहे. या जाहीरनाम्यात जालना तालुक्यासाठी त्यांनी स्वतंत्र नवीन साखर कारखाना, घनसावंगी आणि जालना तालुक्यातील 72 दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी गुंज उपसा जलसिंचन योजना अशा या महत्वकांक्षी प्रकल्पाची हमी त्यांनी दिली असून त्या कशा सत्यात उतरू शकतात. याची चित्रफित त्यांनी जनतेसमोर मांडली आहे.