जालना । प्रतिनिधी – रक्ताचे नाते असतेच परंतू त्याही पेक्षा खरे नाते जपण्याचे काम कुणी केले असेल तर ते घुगे परिवाराने केले आहे, असे प्रतिपादन अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केले. खोतकर हे भाऊसाहेब घुगे यांनी आयोजित केलेल्या दिपावली आणि पाडव्यानिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरंगे, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले, मेघा चौधरी, सत्ंसंग मुंडे, संतोषराव मोहिते, उद्योजक दिपक अंभोरे, बाजार समितीचे संचालक राकेश पवार, राहुल हिवराळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार केल्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, दिपावली- पाडव्यानिमित्त आपल्याला काही संकल्प करायचे असातात. यानिमित्त मीही आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, सुयश चिंतीतो! एक गोष्ट खरी की, आपला भारत- हिंदुस्थान हा विविधतेने नटलेला आहे. या विविधतेतूनच एकता ही निर्माण होते. दिपावली- पाडव्याचेही तसेच आहे, असे सांगून ेते म्हणाले की, मला तुम्ही आई म्हणून आपल्या समस्या सांगा, अडचणी सांगत जा! त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करील. शेवटी आपण कोणावर रुसतो? फुगतो? आपल्याच माणसावर, आईवर आपण रुसतो, रागावतो, चिंडतो! आणि रुसणार नाही तर काय! एखाद्याचे काम झाले नाही तर आपल्याला राग येणे सहाजिक आहे, हे मी पण समजू शकतो, म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, आई मुलासाठी एवढी सुखवेडी असते. खरे तर त्या मुलाला पडल्यानंतर उचलण्यासाठी असते. तर कधी गोड कौतुक करण्यासाठी असते. मला सुध्दा याच भुमिकेत राहयाला आवडेल. मला कल्पना आहे की, आपल्या संकट काळात नेहमीच आम्ही धावून येतो, असे नाही. परंतू नेहमीच मला असेच प्रेम द्या! खारीचा वाटा म्हणून देत चला. खरे तर भाऊसाहेब घुगे हा माझा अलिकडचा कार्यकर्ता परंतू या परीवाने जे प्रेम दिले, ते अनमोल आहे. त्याचे वडील, काका माझे चांगले मित्र होते, जे दिले त्यात खुश राहणारा हा कार्यकर्ता आहे. भाऊसाहेब बद्दल मला प्रसंग आठवतो. सकाळी पावणे आठ वाजता हा कार्यकर्ता माझं मैदान गाजवतो आहे. मी तेथे नसलो तरीही माझा कार्यकर्ता मात्र तेथे आहे, म्हणून मलाही कधी ना कधी तरी तेथे जावे लागते. परंतू तुम्हाला कधीतरी जरा जरी खाली-वर झाले की, तुमची आग तळपायाची मस्तकाला जाते, असे सांगून ते म्हणाले की, क्षमा विरस्य भूषणम्, ही जैन समाजाची शिकवण किमान आपल्या पक्षात तरी राबवायला हरकत नाही, असेही श्री. खोतकर शेवटी म्हणाले.
तत्पूर्वी भाऊसाहेब घुगे यांनी मेळावा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करुन सांगितली. याप्रसंगी सर्वश्री भांदरंगे, पाचफुले आणि सौ. तुल्ले यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम् टेकाळे यांनी केले. यावेळी जालना बदनापूर, भोकरदन- जाफ्राबाद तालुक्यातील कार्यकर्ते, तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सीमाताई खोतकर, माजी नगरसेविका कमल तुल्ले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कालिंदा ढगे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र भोजने संतोषराव मोहिते भूषण भैय्या शर्मा राजेंद्र लाड शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना तालुकाप्रमुख कल्याणराव अवघड भगवान अंभोरे नानासाहेब वानखेडे दत्तात्रय बंगाळे अक्षय पवार अजय कदम अमोल ठाकूर गणेश मोहिते अंकुश पाच फुले कैलास जगताप विजयकुमार दाड महादू गीते हरिभाऊ कापसे अंबादास कोळसकर कैलास दुधाने भगवानराव मदन एकनाथ जायभाय संजय वाघ सौ सीमाताई खोतकर सौ कालींदाताई ढगे,सौ कल्पना घुगे विजयाताई चौधरी सुषमाताई भाकड योगिताताई खोतकर दर्शना ताई खोतकर झोल उज्वलाताई पोखलिया प्रशांत वाडेकर प्रशांत गाडे मनोज शिंदे रामेश्वर शिंदे कैलास गिरी अमोल दाभाडे कैलास खैरे देवा ढाकणे भानुदास राव दिघे दीपक दिघे बाबासाहेब चंद रामेश्वर दराडे विलास तुपे दिनेश बारगजे संदीप दराडे कैलास पालवे डॉ प्रमोद डोईफोडे अमोल कारंजेकर दीपक वैद्य राजू पवार अंकुश गायकवाड यांच्यासह महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.