रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे कॉर्टरजवळ धक्कादायक घडना घडली आहे. या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत असणारा अनोळखी मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 10 दिवसांपूर्वी घडलेली घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील कर्जत चारफाटा रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या झुडपात एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. साधारणतः 55 वर्षीय पुरुषाचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाचा अंदाजे 10 दिवसांपासून तिथे असण्याची शक्यता आहे. यामागे घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह याठिकाणी कसा पोहोचला? त्याचा खून करण्यात आला आहे का? किंवा हा अपघात आहे का? यासंबंधी कर्जत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.




















