अंशतः अनुदानित अतिरीक्त शिक्षकांची अवहेलना करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध आजचा दि 12/12/2022 चा सेवा संरक्षण चा आदेश रद्द करावा आदरणीय मंत्री महोदय यांना नम्र विनंती की सदरचा शासन निर्णय रद्द करावा व आम्ही जी मागणी करीत आहोत त्याचा विचार करून शासन निर्णय घ्यावा. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी झाल्यामुळे शिक्षक संख्या कमी झाली आहे, त्या शिक्षकांचे समायोजन त्याच टप्प्यावर व्हावे ,त्या टप्याच्या शाळेत व्हावे किंवा 100 टक्के अनुदानित शाळेत त्याच टप्यावर करावे , जेणे करून आजपर्यंत त्यांनी जी सेवा केली ती ग्राहय धरावी, आपण शासन निर्णयामध्ये नुमद केले आहे की सन 2022-23 च्या संचमान्यते मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.