भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रविवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी,शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा यांचा स्वराज्य संघटना, भीम सेना, मुस्लिम युवा प्रतिष्टान, महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले, ज्ञानजोती सावित्रीबाई फुले , विश्वरत्न डॉ:बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. थोर महापुरुषा विषयी चुकीचे विधान करणाऱ्या बहुजनांच्या भावना दुखवणार्या वाचाळविरांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सा: पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना निवेदन देऊन करणात आली. या वेळी स्वराज्य संघटनेचे :विकास जाधव, सुरज मव्हारे, दीपक जाधव, कृष्णा लोखंडे, समता परिषदेचे विलास शिंदे, राजू इंगळे, राजू ढोके, मधुकर ढोले, ईश्वर इंगळे, रमेश जाधव भीम सेनेचे विशाल मिसाळ, सागर जाधव, सिद्धार्थ पगारे, कृष्णा साळवे, प्रकाश शेजुळ, अमोल पगारे, सुशील वाघ, अक्षय गायकवाड, नितीन जोगदंडे, मंगेश पगारे, मुस्लिम युवा प्रतिष्ठानचे: फैसल चाऊस, शेख सलीम बळीराजा फाउंडेशनचे :नारायण लोखंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते