यावेळी मा.भास्करराव पाटील दानवे बोलतांना म्हणाले की, प्रखर भारतीय राजकारणी ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य स्व.गोपीनाथ मुंढे साहेबांनी इ. स. १९८० पासून इ. स.२००९ पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच इ.स. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते. १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. भाजपच्या सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते महाराष्ट्राचे माजी आमदार, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना भाजपमधील तळागाळातुन काम करणारा नेता समजले जाते.
राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून मुंडे साहेबांची ओळख होती. मुंडे साहेबांसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी दिमतिला होती. मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्या मधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयां पुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडेसाहेबांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा “लोकनायक” असा गौरव केला होता.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, प्रदेश निमंत्रीत सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे,शहराध्यक्ष राजेशजी राऊत,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष अशोक अन्ना पांगारकर,जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते, अमोल कारंजेकर, इम्रान सय्यद,राजु गवई,विजय कामड,अमोल धानुरे,कृष्णा गायके,वैशालीताई बनसोडे, रवि कायंदे,कृष्णा जाधव,विठ्ठल नरवडे,शरद अंबले,गजानन खंडागळे यांच्यासह व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.