न्याय व्यवस्था कशी असली पाहिजे? कुणाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय केले पाहिजे? शासकीय आणि प्रशासकीय कामकाज करीत असतांना कुणाची काय जबाबदारी आहे? आणि ती कशी पार पाडली पाहिजे? यासह अनेक बाबीवर न्यायीक भुमीका मांडून त्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तीमत्व म्हणजेच रमेश देहेडकर होय. आपल्या कष्टाळू व प्रामाणिक वृत्तीने शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आणि जिद्द मनात असलेले व प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे, विचारवं आणि तळमळीचं नेतृत्व असलेली व्यक्ती म्हणजे रमेश देहेडकर होय. ते आपली सर्वसामान्यांसोबत असलेली नाळ कधीही तुटू देत नाहीत.
आयुष्यात सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही आपले पाय जमिनीवर ठेऊन नम्रतेने आपले कर्तव्य बजावत प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव निर्माण करुन देतात. ज्या पध्दतीने अधिकाराची जाणीव ते करुन देतात त्याच पध्दतीने कर्तव्याचे भान देखील असायलाच हवे असे सांगायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या याच भुमीकेमुळे मी त्यांचा चाहता आहे. प्रेम, दया, माया, करूणा, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी यांनी ओतप्रोत भरलेला सच्चा मित्र, मार्गदर्शक, गुरू असे बहुरंगी प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेल्या राजा माणसाच्या वाढदिवसा बद्दल काय लिहावं कळत नाही. खरं तर त्यांच्या मार्गदर्शक प्रवृत्तीमुळे अनेक तरुण आणि सर्वच समाजातील लहान थोर आज त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक मानतात. त्यामुळे अशा निर्मळ मनाच्या राजा माणसाची कायमच तरुणावर छाप आहे.
तसे त्यांचे सर्व कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. त्यांना कशाचीही कमी नाही. बाप म्हणून त्यांची जी कर्तव्य होती ती त्यांनी अगदी व्यवस्थीतपणे पार पाडली आहेत. मुलींची लग्न झालीत, मुलगाही मोठ्या हुद्यावर विदेशात आहे. शहरातील बहु मजली इमारत त्यांचे वैभव सांगून जाते.
आदर्श गुणांचा अंगिकार करून, सर्व प्रलोभनांपासुन दुर राहुन स्वतःचे वेगळेपण जपणे हे केवळ संत प्रवृतीचे लोकच करू शकतात. आणि तेच वेगळेपण रमेश देहेडकर यांच्यात पहायला मिळत आहे. त्यांना घरात सर्व सुखसोई असताना देखील केवळ गोरगरीबांच्या मदतीसाठी, अत्याचार पिडीतांना न्याय देण्यासाठी ते धडपड करतात. राजकारण, व्यापार, पत्रकार, सामाजिक कार्य यासह त्यांनी विविध क्षेत्रात देखील आपली छाप पाडली आहे. त्यांचे नाव आजही सर्वच स्तरावर गौरवाने घेतले जाते.
एखादा सामाजिक कार्यक्रम असला आणि त्यांना ते कळाले की लगेच तयार असतात जबाबदारी घ्यायला. परंतु, वयोमानानुसार त्यांच्यावर जबाबदारी देणे योग्य वाटत नाही. तरीही ते स्वतःहुन जबाबदारी घेतात. त्यांच्याकडून मार्गदर्शक आणि वडीलधारे म्हणून अनेकजन सल्ला घेतात. परंतु, सल्ला देण्याबरोबरच ते पुढाकार घेऊन कार्यक्रमाची वेळोवेळी माहिती देखील घेत असतात. त्यावरुन त्यांचे सातत्य दिसून येते.
त्यांच्यावर असलेले सामाजिक संस्कार ते कधीच विसरत नाहीत. समाजाच्या विविध उपक्रमात देखील त्यांचा नेहमीच हीरीरीने सहभाग असतो, ब्राम्हणन सभेच्या इमारत बांधकामाला निधी उभा करण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. शिवाय शहरातील विविध विकास कामावर देखील त्यांचे विशेष आणि बारीक लक्ष असते. कुठे काय गोंधळ सुरु आहे ते बरोबर हेरतात. त्यांच्या चाणक्ष बुध्दीने वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडीत असतात. तसा त्यांचा राजकीय दबदबा कायम असल्याने अनेक नेतेही त्यांच्या घरी भेटी देतात. त्यामुळे त्यांच्या सुचना आणि विकास कामाच्या संदर्भात आवाज उठविल्यास तो प्रश्न देखील मार्गी लागतो हे मात्र नक्की!
नगरसेवक, ह्युमन राईट्स ऑर्गनाझेशन, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता या क्षेत्राबरोबरच त्यांचा इतर क्षेत्रातील अभ्यास देखील चांगला आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रलंबीत प्रश्नांना हात घालून ते सोडविले आहेत. शहरातील रस्ते, पाणी, विज, स्वच्छता, पर्यावरण यासह त्यांनी अनेक प्रश्नावर त्यांनी नेहमीच आवाज उठविला आहे आणि कायम उठवित राहतील यात शंका नाही. समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे? कोणत्या धर्माचा आहे? त्याची आर्थीक परिस्थती काय आहे? याचा कोणताही विचार न करता केवळ तो एक पिडीत आहे म्हणून त्याला न्याय देण्यासाठी धाडकन उठून कोणत्याही कार्यालयात जाण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या डोळ्यासमोर जे सत्य असेल त्यावर ते ठाम असतात. अन्याय करणारा कुणीही असला तरी त्याच्या विरोधात बंड केल्याशिवा ते राहत नाहीत. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही देखील पुढे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
अशा या बाप माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !