जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत दिनांक 25 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे, असे कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवार यांना एका छत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा महास्वयंम वेबपोर्टलवरून दिनांक 25 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ईपीपी ट्रेनी, मशिन ऑपरेटर आणि नियमित रिक्तपदे यासाठी ऑनलाईन मुलाखती व्दारे भरती प्रक्रीया करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्यांपैकी एल & टी कन्स्ट्रक्शन स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल (मुंबई) यांच्याकडे असिस्टंट शटरिंग कारर्पेंटर 50 रिक्तपदे , असिस्टंट बार बेंडर 50 रिक्तपदे , एडवांस्ड मेसनरी 50 रिक्तपदे , टीलर 50 रिक्तपदे , श्री फॅब्रिकेटर्स, जालना यांच्याकडे वेल्डर 03 हेल्पर 02 रिक्तपदे अशी एकूण -205 रिक्तपदे प्राप्त झाले असून, इतर नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या सुयोग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रते नुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.
तसेच, भरती इच्छुक नियोक्ते (Employers) यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शन वर Clik करुन ONLINE JOB FAIR JALNA-4 (2022-23) यावर त्यांचेकडील जनरल, ईपीपी, ॲप्रेटिंस रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी विभागाच्या वरील वेबपोर्टलवर विनामुल्य करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी 02482-299033 आणि ई-मेल jalnarojgar@gmail.com यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीतजास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी यांनी केले आहे.