मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणुक शाखेत दि. 1 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीपर्यंत जमा कराव्यात. दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मडळ, मंडळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार-2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षकाखाली व ‘What’s new’ या सदरात Late Yashwantrao Chavan State Literatur Award 2022 Rules Book and Application Form’ येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https//sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहे.
स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणुक शाखा येथे विनामुल्य उपलब्ध आहे. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह जिल्ह्याधिकारी कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दि. 1 ते 31 जानेवारी 2023 या विहीत कालावधीत पाठवावे. लेखक/प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/ पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार-2022 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2023 हा राहील. मुदतीनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.