जालना (प्रतिनिधी) ः मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्हयाच्या वतीने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना – अभ्यासक व सामान्य कार्यकर्ता आदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणासाठी कायदेशीर दिशा ठरणार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दांम्पत्य, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अवमान प्रकरणी पुढील भमिका जाहीर केली जाणार असून रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10. 30 ते सायंकाळी 05. 30 दरम्यान जालना शहरातील मातोश्री लॉन्स, अंबड रोड, जालना येथे संपन्न होणार आहे.
सदरच्या ‘गोलमेज परिषदेत’ महापुरुषांच्या अवमाना संदर्भात पुढील भुमिकेसह मराठा आरक्षणाचा घटनात्मक व कायदेशीर मार्ग काय आहे? सर्वच राजकीय पक्षाची आणि सरकारची आरक्षणाच्या संदर्भात निश्चित काय भुमिका आहे? आरक्षणासाठी घटनात्मक व कायदेशीर बाबी काय आहेत? सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेची सद्य स्थती काय आहे? त्यात काही त्रुटी आहेत काय? असल्यास कुठल्या त्रुटी आहेत? मराठा आरक्षण नेमके कसे मिळू शकते? यासाठी विभागीय राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर कुठले पर्याय उपलब्ध आहेत? या विषायावर कायदेशीर अंगाने व दृष्टीकोनातून दिशादर्शक व्यापक मंथन होणार असून, दमणकारी निजामशाही जोखडातून मुक्ती मिळवलेल्या मराठवाडयातील सामाजिक मागासलेल्या मराठयांच्या संदर्भात विशेष विचार करण्यात येऊन, विविध न्याय निवाडे, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल पत्र – घटनात्मक दृष्टीने आरक्षण देण्यासाठी असलेले उपाय यावर सविस्तर मंथन करणे व मराठयांना हक्काचे कायमस्वरूपी आरक्षण मिळण्यासाठी पुढील ठोस दिशा ठरवणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज अवमान आणि तत्कालीन इतिहासाची मोडतोड करून सोयिस्कर इतिहास खपवण्याच्या घाणेरडया प्रकारवर ही या राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत रूपरेषा ठरणार असून, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारकासाठी राज्यशासनाने कालबद्व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आग्रही भूमिका जाहीर केली जाणार आहे.
अशा या अतिशय जिव्हाळयाचा आणि कायदेशीर मुददयावर मार्ग काढण्यासाठी जालना येथे मराठा क्रांती मोर्चा जालना च्या आयोजन, नियाजनाखाली पार पडणाऱ्या राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये राज्यातील सकल मराठा समाल बंधू भगिनी आणि मराठा सामाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आतोनात पयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासह विविध सामाजिक संघटना, राज्यभारातील कार्यरत तालुका-जिल्हा यातील सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी आदी सर्वांनी रविवार दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 : 30 ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत मातोश्री लॉन्स मंगल कार्यालय, अंबड रोड, जालना येथे आवर्जून सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जालना येथील राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील, जगन्नाथ काकडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष्ा संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, कैलास खांडेभराड, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, राजेंद्र गोरे, छावाचे संस्थापक संभाष कोळकर, शरद देशमुख, रवि राऊत, सुभाष चव्हाण, ज्ञानेश्वर ताकट, क्रांतिवीर छावा संघटनेचे पंकज जऱ्हाड, शिवादादा शेजूळ, अखिल भारतीय छावाचे देवकर्ण वाघ, संदीप ताडगे, स्वराज्य सेनेचे अप्पासाहेब कुडेकर, गणेश ढोबळे, करण जाधव, शिवबा संघटनेचे मनोज जरंगे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे लक्ष्मण निहाळ, प्रताप देठे, गणेश शिंदे, रमेश गव्हाड, विमलताई आगलावे, विभावरी ताकट, दिपाली दाभाडे, शितल तनपुरे, मंदा पवार, रेखा तौर, प्रभू गाडे, ॲङ राम कुऱ्हाडे, शिवसंग्रामचे निलेश गोर्डे, राजू मोरे, आकाश जगताप, राम सावंत, सुरेश तळेकर, तुळशीराम चंद, प्रा.नवल सर, ज्ञानेश्वर उढाण, चिमणे, काकासाहेब खरात, करण देशमुख, ज्ञानेश्वर बोरूडे, आदीनी केले आहे.