जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली असून जुना जालना भागातील शंकर नगर येथील एनआरबी गल्लीत पतीने पत्नीचा खून करुन घराला बाहेरुन कडी लावून पती फरार झाला झाला. ही घटना आज दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव (आटोळे) येथील किशोर आटोळे आणि इंदुबाई आटोळे हे दांपत्ये शंकर नगर येथील छठइ गल्लीत रावसाहेब पडूळ यांच्या घरी मागील 7 महिन्यापासून भाड्याने खोली घेऊन राहत होते. किशोर आटोळे हा औद्योगिक वसाहतीत मजुरीचे काम करीत आहे. आज सकाळी उशिरापर्यंत आटोळे यांच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली आढळून आल्याने घरमालकाने जवळच राहणार्या आटोळे यांच्या बहिणीला बोलावून घेऊन खोली उघडली. त्यावेळी पलंगावर इंदूबाई किशोर आटोळे (वय 40) ही मृतावस्थेत आढळून आली. यावेळी तिच्या डोक्यावर मार लागल्याचा मोठा घाव होता. घटनेची माहिती कदीम जालना पोलिसांना तातडीने देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस हवालदार कैलास जावळे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल झाले. सदरील मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदानासाठी हलविला आहे.