जालना (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्हयाच्या वतीने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना – अभ्यासक व सामान्य कार्यकर्ता आदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणासाठी कायदेशीर दिशा ठरणार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दांम्पत्य, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अवमान प्रकरणी पुढील भमिका जाहीर केली जाणार असून आज रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 04 दरम्यान जालना शहरातील मातोश्री लॉन्स, अंबड रोड, जालना येथे संपन्न होणार आहे.
या गोलमेज परिषदेत सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जालना राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील, जगन्नाथ काकडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष्ा संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, कैलास खांडेभराड, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, राजेंद्र गोरे, छावाचे संस्थापक संभाष कोळकर, शरद देशमुख, रवि राऊत, सुभाष चव्हाण, ज्ञानेश्वर ताकट, क्रांतिवीर छावा संघटनेचे पंकज जऱ्हाड, शिवादादा शेजूळ, अखिल भारतीय छावाचे देवकर्ण वाघ, संदीप ताडगे, स्वराज्य सेनेचे अप्पासाहेब कुडेकर, गणेश ढोबळे, करण जाधव, शिवबा संघटनेचे मनोज जरंगे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे लक्ष्मण निहाळ, प्रताप देठे, गणेश शिंदे, रमेश गव्हाड, विभावरी ताकट, दिपाली दाभाडे, शितल तनपुरे, मंदा पवार, विमलताई आगलावे, रेखा तौर, प्रभू गाडे, ॲङ राम कुऱ्हाडे, शिवसंग्रामचे निलेश गोर्डे, राजू मोरे, आकाश जगताप, राम सावंत, सुरेश तळेकर, तुळशीराम चंद, प्रा.नवल सर, काकासाहेब खरात, करण देशमुख, ज्ञानेश्वर बोरूडे, आदीनी केले आहे.