जालना (प्रतिनिधी):- भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा कार्यालय,जालना येथे आज दिनांक 07 जानेवारी 2023 रोजी वार शनिवार रोजी पार पडली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जेष्ठ कार्यकर्ते भिमराव डोंगरे, समृध्दी शुगर व घृष्णेश्वर शुगर चेअरमण सतिषजी घाडगे, प्रदेश कार्य समिती सदस्य,रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे, प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस अतिक खान, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.संध्याताई देठे,शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा.किरण पाटील,जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, अनिलराव कोलते, अवधुत खडके, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, बाबुराव मामा खरात,वसंतराव जगताप, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.उषाताई पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, वसंतराव शिंदे, सुरेश दिवटे, विजय कामड,माजी जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी सभापती राजेश चव्हाण, प्रदेश वैद्यकिय संयोजक डॉ.अमोल कारंजेकर, जिल्हा चिटणीस स्नेहा जोशी, डॉ.तुकाराम कळकुंबे, मराठवाडा युवती प्रमुख शमिष्ठा कुलकर्णी ,राजेश जोशी,रोषण चौधरी,गोविंदराव पंडीत,औदुंबर बागडे, नगरसेवक रेणुका निकम,सुनिल पवार,शशीकांत घुगे, राहुल इंगोले आदीची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर व शहरातील वार्डा वार्डात जावून केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना राबविण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुक सह सर्व निवडणुका भाजपा कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या बळावर बहुमताने जिंकणार असून येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका,2024 लोकसभा व विधानसभा निवडणुकी पुर्वी नवीन मतदार नोंदणी सतत चालु असते आपण सर्वांनी यांचा लाभ घेत आपल्या प्रभागात, गटात, गणात व गावात नवीन मतदार नोंदणी करुन घेवून भाजपाची मतदार संख्या वाढवावी. आगामी काळात येणाऱ्या 10 वी, 12 वी, स्पर्धा व शालेय परीक्षांच्या पार्श्वभुमीवर मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा विदयार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम परीक्षा पे चर्चा आपणास ज्याप्रमाणे सुचना मिळतील त्याप्रमाणे घेणे आहे. दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जालना जिल्हा दौरा यांचा असून व दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा मा.चित्राताई वाघ यांचा जालना जिल्हा दौरा आहे. महिला मोर्चा पदाधिकारी, महिलांचे संघठन वाढीसाठी उपयोग होईल अशी रचना करावी व मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार मा.श्री.किरण पाटील यांना जालना जिल्हयातुन मोठया प्रमाणात मताधिक्य दिले जाईल असे भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीत भाजपा पदाधिकारी यांच्याशी बोलतांना व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी प्रस्तावीक केले.
यावेळी सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा सौ.शुंभागीताई देशपांडे, सतिषचंद्र प्रभु,रहेमान शेख, रमेश तारगे, डॉ.रमेश शाहणे, राजे जाधव,संदीप खरात, राजु साळवे,शिवाजी वेताळ, नामदेव तिडके, रावसाहेब भवर, हरिचंद्र शिंदे, सुनिल खरे, उध्दव काकडे, भरत परदेशी, राजकुमार उगले, राजु साळवे, भगवान मात्रे, संजय डोंगरे, शेख मुसा, डोंगरसिंग साबळे, विकास कदम, शारदा काळे, सुमित सरडकर, महेश निकम,अमरदिप शिंदे,उध्दव दुनगहू,सुरेश कदम, नेमीचंद भुरेवाल, रवि कायंदे,संदीप खरात,सुधाकर उबाळे, नामदेव ढाकणे,शिवाजी निकाळजे,सुभाष देव्हडे,भरत उगले आदीसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.