दिवसेंदिवस निसर्ग कोपतो आहे आणि विक्राळ रूप धारण करून मानवाला धर्तीमध्ये सामावून घेत आहे ही बाब तुर्की-सीरियाचा भूकंप आखोदेखी बयान करीत आहे. भुकंपामुळे मृत्यूचे तांडव दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवारला तुर्की व सीरियामध्ये दिसून आले आणि अनेकांसाठी हा दिवस काळ ठरला व मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी संपूर्ण जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी पहाली व संपूर्ण विश्व स्तब्ध झाला आणि मदतीकरीता भारतासह ७० देशांनी हात सामोरं केला आहे. दिवसेंदिवस पृथ्वीवर होत असलेला अन्याय, अत्याचार आज मानवजातीच्या जिव्हारी लागतो आहे आणि हळूहळू धर्ती-आकाश-पाताळ-जल-स्थल-वायु विक्राळ रूप धारण करीत आहे.यांचे जिवंत उदाहरण तुर्की,सीरियाच्या भुकंपावरून लक्षात येते.सध्याच्या परिस्थितीत दिवसेंदिवस न-भुतो-न-भविष्यती अशा प्रकारच्या अंगावर शहारे येणाऱ्या अनेक नवीन -नवीन घटना आपल्याला जगात पहायला मिळत आहे.
पुढेचालुन निसर्ग आणखी भयानक विक्राळ रूप धारण करू शकते याला नाकारता येत नाही.तुर्की, सीरिया येथील भुकंपाने पृथ्वी फाटली की काय अशी भीती जाणवायला लागली.संपुर्ण तुर्की व सीरियामध्ये ३६ तासात ५५० छोटे-मोठे भुकंपाचे धक्के बसले.म्हणजे आज संपूर्ण तुर्की-सीरिया भुकंपाच्या छायेत असल्याचे स्पष्ट दिसून येते.तुर्कीमध्ये सोमवारला ३० मिनिटांत तिनं भीषण व भयावह भुकंपाचे धक्के बसले.पहिला भुकंप ४ वाजुन २७ मिनिटांनी आला याची तीव्रता ६.७ रिक्टर इतकी होती, यानंतर ११ मिनिटांनी पुन्हा भुकंप आला त्याची तीव्रता ५.६ रिक्टर स्केल इतकी होती व तिसरा भुकंप १९ मिनिटांनी आला यात २० धक्के जाणवले व याची तीव्रता ६.६ रिक्टर स्केल इतकी होती.यामुळे तुर्कीतील दमास्कस,अलेप्पो,हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये पत्यांच्या बंगल्या सारख्या इमारती धाराशाही झाल्या.यामुळे मृत्यूचा आकडा १० हजारांच्या वर जावु शकतो असा अंदाज आहे.तुर्की, सीरियामध्ये आलेल्या भुकंपाचे धक्के अनेक देशांत सुध्दा जानवल्याचे सांगितले जाते.सोमवारला तुर्की व सीरियामध्ये महाभयानक भुकंप आलाच परंतु दुसऱ्या दिवशीही मंगळवारला भुकंपाचे तीव्र धक्के तुर्की व सीरियाला सोसावे लागले.तुर्कीमध्ये आतापर्यंत ५४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर सीरियामध्ये १८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी सुत्रांकडून समजते. आपण कल्पनाच करू शकत नाही अशाप्रकारची त्रासदी व विनाशलिला आज तुर्की व सीरिया सहन करीत आहे.या भीषण त्रासदीमध्ये २ करोड ३० लाख पेक्षा जास्त लोक प्रभावीत होवू शकतात व लाखोंच्या संख्येने जखमी होवू शकतात अशी आशंका डब्ल्युएचओ ने वर्तवली आहे.त्याचप्रमाणे मृतांचा आकडा २० हजारांच्या वर जाऊ शकतो म्हणजेच स्थिती अत्यंत गंभीर,भयावह आणि अंगावर शहारे येणारी आहे.तुर्कीतील मृत्यूच्या तांडवाची भयावह स्थिती पहाता तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोआन यांनी १० राज्यात ३ महिन्यांसाठी इमरजेंसी (आपात्काल)लागु केलेली आहे.आता तुर्की व सीरियाच्या नंतर रशियामधील आइसलैंड येथे भुकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे सांगितले जाते याची तीव्रता ५.३ रिक्टर स्केल इतकी होती.म्हणजे निसर्गाच्या होत असलेल्या ह्रासामुळे संपूर्ण जगात कुठेही केव्हाही भुकंप किंवा सुनामी येवू शकते ही बाब संपूर्ण विश्वाने लक्षात ठेवली पाहिजे.जगाने निसर्गाचे संतुलन जर सुरळीत आणि समतोल ठेवले नाही तर भुकंप, सुनामी, महापुर, अती उष्णता, अती थंडी, अती पाऊस, वनवा लागने यामुळे केव्हाही कधीही विक्राळ रूप धारण करू महाभयानक परिस्थिती निर्माण होवू शकते याला कोन्हीही नाकारू शकत नाही.कोणताही विनाश असो यात मानवाचीच जीवीत हानी होत नाही तर वन्यजीव प्राणी, संपत्ती, संपूर्ण जीवजंतू यांना सुध्दा आपले प्राण मुकावे लागते व सामना करावा लागतो.याकरीत जगातील युद्ध जन्य परिस्थिती ताबडतोब थांबली पाहिजे.रशिया- युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी २०२३ ला एक वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही दोन्ही बाजूंनी कोन्हीही युद्ध थांबवीण्यास तयार ही जगासाठी व निसर्गासाठी चिंताजनक बाब आहे.रशिया-युक्रेन युध्दात हजारोंच्या संख्येने मानव हानी झालीच सोबतच वित्तीय हानी, जीवजंतू, जंगलसंपदा नेस्तनाबूत झाली आहे.हीबाब जगातील संपूर्ण देशांनी लक्षात ठेवली पाहिजे.
भुकंपासारख्या भयावह घटना घडल्यानंतर संपूर्ण जग एकवटतो ही चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे.परंतु जगातील संपूर्ण देशांनी युद्धजन्य परिस्थिती रोखली व गृहयुद्ध रोखले तर आपण निसर्गाला अवश्य वाचवु शकतो.यामुळे जल,स्थल,वायु यात निर्माण होणारे प्रदुषण व होणाऱ्या जीवीत हानी यावंर अवश्य नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत होईल.भुकंपाचे मुख्य कारण खणण,परमाणु परिक्षण , दारूगोळा, वाढते औद्योगिकीकरण,जंगलतोड व जगातील देशात होणारे युद्ध आणि हतीयार बनवीण्याची शर्यत या मानवाच्या अतीरेकामुळे पृथ्वी भयभीत झालेली आहे यामुळेच आपल्याला भुकंपाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.जगात अशीच परिस्थिती रहाली तर जग संपायला वेळ लागणार नाही.त्याचप्रमाणे असे समजायला हरकत नाही की सध्या”जगात होणारा विणाश हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे”. जगात सध्याच्या परिस्थितीत चीन, अमेरिका, रशिया, युक्रेन, उत्तर कोरिया,नाटो देश एकमेकांवर बंदुक ताणुन आहे म्हणजेच आपणच मौत का कुंवा खोदत असल्याचे दिसून येते.जगातील अनेक देश भुकंपाच्या छायेत आहेत.यात भारताचा विचार केला तर भारतीय उपखंडाचा सुमारे ५९ भुभाग भुकंपप्रवण क्षेत्रात आहे.यातील ३८ शहरांना भूकंपाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.देशभरात १९५० पासून आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक जीवीतहानी झाली असून, कोट्यवधींची वित्तहानी झाली आहे.असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.ही सुध्दा भयावह स्थिती आहे.मागील वर्षात देशभरात प्रामुख्याने उत्तर भारतात ९०० पेक्षा अधिक वेळा भुकंपाचे धक्के बसले यात काही ठिकाणी भुकंपाची तीव्रता ४.० रिक्टर स्केल पेक्षा कमी होती असे राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने म्हटले आहे.म्हणजेच भारत सुध्दा भुकंपाच्या छायेत आहेच. मानवाच्या अतीरेकामुळे भुकंपासारख्या महाकाय घटनांशी सर्वांनाच सामना करावा लागतो आहे.त्यामुळे जगातील देशांना विनंती करतो की परमाणु परिक्षण, युद्धजन्य परिस्थिती थांबवुन पृथ्वीची जोपासना करावी यातच सर्वांचे कल्याण होईल असे मला वाटते.
रमेश कृष्णराव लांजेवार