रात्रीची वेळ होती आणि डोक्यात विचारांची मालिका काही केल्या झोपू देत नव्हती… अगदी ते दिवस आपण सगळ्यांनी अनुभवलेले , जगलेले. कोणी कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला तर कोणी प्रिय जणांना कायमचं गुड बाय केलं. कोविड चे दिवस ते.. आज ही भयानक वाटते सर्व. पण एक कायमची शिकवणूक दिली ते म्हणजे “स्वतःसाठी जगा,स्वतःची काळजी घ्या ” .. स्वतः सुरक्षित तर तुमचं कुटुंब ही सुरक्षित. हे झाले स्वतःसाठी पण अजून काही नियमावली आखून दिल्या होत्या आठवतात ना, की विसरले? हे काही काय बोलताय तुम्ही , कसं शक्य आहे?,” वो तो हम जीते जी नही भुल सकते” कदाचित सगळ्यांना असेच वाटत असेल. पण सगळ्यात महत्वाचा नियम होता तो म्हणजे ” मास्क “घाला.
एरवी हा मास्क फक्त अगदी मोजक्या प्रोफेशन मध्येच वापरत असत. अगदी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी वापरला असेल पण गरज होती.हा जो भयानक काळ चालू होता आणि हळू हळू सर्व काही सुरळीत चालू करत होते झाले तेव्हा कुठे “मास्क अप” आणि असे बरेच काही नवीन शब्द कानावर ऐकू येऊ लागले जे सर्व सामान्य लोकांनी यापूर्वी ऐकले नव्हते…
“मास्क अप” म्हणजे नक्की काय ? फक्त आपणाला हेच माहित होत की मास्क घाला.. काही लोक पोलीस पकडतात म्हणून मास्क घालायचे बरोबर ना… पण खरा अर्थ तर हाच होता की,” स्वतः चे रक्षण करा आणि इतरांना संकटात पाडू नका.. हो पण हे सर्व कोरोना पर्यंत मर्यादित न ठेवता आपण स्वतःसाठी केलं पाहिजे . मास्क अप फक्त आरोग्यासाठी नाही तर हे विचारांसाठी आणि मनासाठी आहे कारण हे चांगलं तरच सर्व काही उत्तम.. तुमच्यावर वाईट विचार, वाईट वेळ, आजार , दबाव असेल,बाहेर असेल,ऑफिस मध्ये वगेरे कुठेही असेल तर मास्क घाला न घाबरण्याचे,कोणी वाईट बोलत असेल तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून सोडून द्या,जिथे तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा जाणवेल काही लोक पण असतात तर तिथे चार हात लांब रहा आणि स्वतःची काळजी घ्या.. टॅग लाईन आठवते ना ,” दो गज की दुरी मास्क हे जरुरी” किती साधं आणि सरळ आहे मग जगा ना छान!!!
लीना निकाळजे