जालना : शिवसेना पक्षात अनेक लोक आले काही निघूनही गेले. परंतु त्यांच्या जाण्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार संपणार नाहीत. कितीही अघात झाले तरी शिवसैनिक पुन्हा प्रचंड ताकदीने उभा राहतो हे अनेकदा सिध्द झाले आहे, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी जालना येथील शिवगर्जना मेळाव्याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या.
यावेळी माजी आमदार अनिल कदम, युवासेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु, उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, माधवराव कदम, भगवानराव कदम, रावसाहेब राऊत, मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार,मनिष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, बाबासाहेब तेलगड, अशोक आघाव, हनुमान धांडे, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेना राज्यविस्तारक भरत सांबरे, जिल्हा युवाधिकारी शिवाजी शेजुळ,गणेश काळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पेडणेकर म्हणाल्या की, पक्षाचे चिन्ह, नाव, गेल तरी सामान्य शिवसैनिक व नागरिकांच्या मनातील उध्दव ठाकरे यांचे स्थान कुणीही हिरावून घेवून शकत नाही. आगामी काळातही महाविकास आघाडी ही काळाची गरज असून सर्वांंनी एकत्र येत विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याचा त्या म्हणाल्या. कोविड काळात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांची प्रचंड काळजी घेतली, त्यांना धीर दिला. कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणू दिली नाही. याची सामान्य नागरिकांना पुर्ण कल्पना आहे. त्यामुळे सामान्य नागरिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा असल्याचे चित्र दिसते. पक्षाचे युवानेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पक्षातील बंडखोरीनंतर अत्यंत ताकदीने कामाला लागले असून राज्यात सर्वत्र फिरवून ते जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा लोकांच्या मनातील ठाकरे कुटूंबा विषयी असलेली सहनुभूती दाखवतो. आदित्य ठाकरे हे मंत्री असतांना त्यांनी केलेल्या कार्यातून आपले कर्तुत्व सिध्द केले. त्यामुळेही अनेकांना पोटदुखी झाली. आगामी काळात होणार्या सर्व निवडणुकांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी आपल्या गावा-गावात जावून प्रयत्न करावेत, असे आवाहनही पेडणेकर यांनी केले.
माजी आ. अनिल कदम म्हणाले की, कसलाही राजकीय वारसा नसणार्यांना जाती-धर्मापलीकडे विचार करुन बाळासाहेबांनी अनेकांना संधी दिली. त्यातून ते आमदार, खासदार, मंत्री झाले. काहींनी एवढे मिळवूनही पक्षाशी ईमानदारी बाळगली नाही. मिंधे गटाची वाट धरत खुद्द पक्षप्रमुख व पक्षालाच अडचणीत आणले. हे अत्यंत दुर्देवी आहे. अत्यंत चाणक्ष व कटकारस्थान करुन राक्षशी शक्तीचा वापर करुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांना या ना त्या कारणावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्याचेही त्यांनी म्हटले.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978