जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणूकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झालीय. जालना जिल्ह्यातील सर्वांचेच या निकालाकडे लक्ष लागून आहे. सध्याच्या निकालाची परिस्थीती पाहता जालना जिल्ह्यातील दोन नवे आमदार निवडून येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये एक अर्जुनराव खोतकर आणि दुसरा नवा चेहरा म्हणजे हिकमत उढाण निवडूण येण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
विडीओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राईब करा
सकाळपासून मतमोजणी सुरु झाल्यापासून जालना विधानसभेचे शिवसेना(शिंदे) उमेदवार अर्जुनराव खोतकर हे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल हे पिछाडीवर आहेत. घनसावंगी विधानसभेतील शिवसेना(शिंदे) उमेदवार हिकमत उढाण हे आघाडीवर असून गेल्या अनेक वर्षापासून आमदार म्हणून निवडूण येणारे राजेश टोपे हे मात्र पिछाडीवर आहेत. परतुर विधानसभेचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी आघाडी कायम ठेवली असून शिवसेना (ठाकरे) उमेदवार ऐ.जे. बोराडे हे पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे तिसर्या क्रमांकावर होते, परंतु, 11.55 वाजेच्या सुमारास जेथलिया यांनी ऐ.जे. बोराडे यांना मागे टाकत दुसर्या क्रमांकावर येण्याचा मान मिळविला. बदनापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार नारायण कुचे हे आघाडीवर असून राष्ट्रवादी(शरद पवार) उमेदवार बबलु चौधरी हे पिछाडीवर आहेत. भोकरदनमध्ये देखील भाजपचे उमेदवार संतोष दानवे हे आघाडीवर असून राष्ट्रवादी(शरद पवार) उमेदवार चंद्रकांत दानवे हे पिछाडीवर आहेत.
एकंदरीत परिस्थीती पाहता जालना जिल्ह्यातून अर्जुनराव खोतकर आणि हिकमत उढाण हे आमदार म्हणून निवडणून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत.
सकाळी 11.30 वाजेपर्यंतची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
जालना
अर्जुनराव खोतकर – 17826 (8401 आघाडी)
कैलास गोरंट्याल – 9428 (-8401)
अब्दुल हाफीज – 652 (-17177)
डेव्हीड घुमारे – 2154 (-15675)
——–
घनसावंगी
हिकमत उढाण – 20508 (+ 2938 आघाडी)
राजेश टोपे – 17570 (-2938)
सतिष घाडगे – 5355 (-15153)
कावेरी खटके – 4686 (-15822)
———-
परतुर
बबनराव लोणीकर – 15184 (+ 1392 आघाडी)
ऐ. जे. बोराडे – 13792 (-1392)
सुरेशकुमार जेथलिया – 12670 (-2514)
———–
बदनापूर
नारायण कुचे – 43107 (+ 14875 आघाडी)
बबलु चौधरी – 28232 (-14875)
———-
भोकरदन
संतोष दानवे – 23242 (+ 5322 आघाडी)
चंद्रकांत दानवे – 17920 (-5322)