जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही गेल्या वर्षे 46 वर्षापासून सुरु असून या वर्षी 46 च्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष पदी दिपक धामने तर सचिव पदी राजेश ओ. राऊत यांची निवड झाली. ही निवड दि. 11 मार्च 2023 रोजी शासकीय विश्रामगृह जालना येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
ही बैठक सुधाकर रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीत सर्वानुमते 2023-24 साठी अध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदचे कर्मचारी दिपक धामने यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्याला सर्वांनी अनुमोदन देत त्यांना अध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आले. त्यानंतर सचिव पदासाठी सामाजीक शैक्षणिक आणि ग्रंथालय चळवळीचे नेते राजेश ओ. राऊत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. यावेळी त्यांना सर्वांनी अनुमोदन देत सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या अध्यक्ष आणि सचिव पदाच्या बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बैठकीस ज्येष्ठ नेते अॅड. बी. एम. साळवे बाबा, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, गणेशसेठ रत्नपारखे, परमेश्वर गरबडे, बबनराव रत्नपारखे, प्रमोद रत्नपारखे, सुधाकर भाई रत्नपारखे, सुनिल साळवे, संजय इंगळे, महेंद्र रत्नपारखे, भारती हेरकर, संजय हेरकर, अरुण मगरे, कैलास रत्नपारखे, अशोक रगडे, योगेश रत्नपारखे, मिलिंद कांबळे, विनोद भगत, बाबासाहेब सोनके, राजु गवई, पपू चत्रे, अच्युत मोरे, सुशील वाठोरे, अशोक घोडे, महेंद्र बनकर, प्रभाकर घेवंदे, अंकुश चव्हाण, डि. वाय. मोकळे, सिध्दार्थ मोरे, प्रकाश वाघ, चतुरसिंग गोफणे, डॉ. अशोक घोडे, गोविंद पतंगे, उमेश कुटे, विलास रत्नपारखे, प्रकाश खरात, सचिन मुळे, नाना जाधव, अकबर इनामदार, चाऊस यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करतांना व्याख्यान माला 46 व्या वर्षांत पदार्पण करीत असुन विद्वान, विचावंत व्याख्याते आमंत्रित करण्याचा निर्धार राजेश ओ. राऊत यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रमोद रत्नपारखे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय इंगळे यांनी केले.