सोलापूर (निर्मला जावळे ) – जिल्ह्यातील दक्षिण सोलापुर मधील कुंभारी येथे गौरी गणपती आणि कुंभारीच्या 75 व्या गणेश अमृत महोत्सवानिमित्त मंगळागौर कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांनी सादर केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाचे सर्वांचेच लक्ष वेधले.
सोलापूर जिह्यातील दक्षिण सोलापूर मधील कुंभारी गावातील जय हनुमान गोलकट्टा येथे 75 वा गणेश उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये छोटया मुलांचे व मोठया मुला-मुलींचे गट करण्यात आले होते. तसेच महिलांचेही कार्यक्रम घेण्यात आले. संगीत खुर्ची, लिंबू चमचा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मंगळगौर नृत्य यासह विविध कार्यक्रम मंडळाने घेतले. मंडळाणे मुला-मुलींचे व महिलांच्या विविध कलागुणांना वाव दिलाय. तसेच महिलांचे कुंभारी गावात गणपतीसमोर पहिल्यांदा च मंगळगौर नृत्य सादरीकरण झालं. महिलांनी घरी गौरी गणपती असतानाही 5 दिवस रोज रात्री 10 ते 11 या वेळेत 1 तास आपापली जबाबदारी पूर्ण करुन सराव केला. आज नृत्य सादर केल्यानंतर महिलांचा उत्साह गगनात मावत नव्हता. सर्व महिलांनी गोलकट्टा प्रतिष्ठान कुंभारी गणेश मंडळाचे मनापासून आभार मानलेत.




















