जालना – चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर ही घटना घडली आहे. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास संभाजीनगर ते जालना महामार्गावरील बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खाली कोसळली.
गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात खासगी बसला हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनग ते जालना महामार्गावर बदनापूर येथे ही घटना घडली. या महामार्गावर मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली.
या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर तसेच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर अपघातामीधल जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.




















