जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली.





















