जालना – शहरातील नळगळल्ली भागात राहणारा राहुल कैलास जाधव याला धारदार तलवारी बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन त्याच्या ताब्यातून 3 धारदार तलवारी जप्त केल्यात. ही कारवाई आज दि. 4 जानेवारी रोजी करण्यात आलीय. या संदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलीय.

जालना जिल्हयात अवैधरित्या धारधार शस्त्रे आणि तलवारी बाळगणार्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पथकं तयार करुन कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं. त्यानंषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना राहुल कैलास जाधव रा. भारतमाता मंदीर, नळगल्ली जालना हा त्याच्या राहत्या घरात 3 तलवारी अवैधरित्या बाळगून असल्याची माहिती पोलीसांनाद मिळाली. त्यामुळे पोलीसांनी झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून 3 तलवारी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्यात. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहा. पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस अंमलदार विनायक कोकणे, रामप्रसाद रंगे, दिपक घुगे, लक्ष्मीकांत आडेप, प्रशांत लोखंडे, संभाजी तनपुरे, सचिन आर्य, देविदास भोजणे, सतीश श्रीवास, आक्रुर धांडगे, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, भागवत खरात यांनी केलीय.




















