जालना – जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बदनापूर येथील तहसिलदार यांना 30 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले होत. त्यामुळे त्यांच्यासह अन्य एकावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने तहसिलदार सुमन उध्दवराव मोरे आणि महसुल सहाय्यक निलेश धर्मराज गायकवाड यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बदनापूर च्या तहसिलदार सुमन उद्धवराव मोरे आणि महसुल सहाय्यक निलेश धर्मराज गायकवाड यांना वारसाचा फेर घेण्यासाठी घ्यायच्या नोंदीसाठभ 30 हजाराची लाच मागीतली होती. परंतु तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे बदनापूर च्या तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना तपासकामी अटक करून आज दि. 04 जानेवारी 2024 रोजी न्यायालयात हजर केलं असता अतिरिक्त विशेष न्यायधीश के. एम. जयस्वाल यांनी तहसिलदार सुमन मोरे आणि निलेश गायकवाड यांना 6 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.




















