जालना ते मंठा रोडवरील पोखरी पाटी येथे रस्त्याच्या बाजुने साईट पंखे भरण्याचं काम करणार्या कामगाराला इंडीकाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवार दि. 15 फेब्रवारी 2024 रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास घडली.

जालना ते मंठा रोडवर साईट पंखे भरण्याचं काम करणारे कामगार हे दुपारी जेवणाची वेळी झाल्याने आणि उन्हाचा कडाखा असल्याने त्यांनी रोडच्या खाली पंख्यावर ट्रॅक्टर लावून ते ट्रॅक्टरखाली जेवन करीत बसले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका इंडीका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी ट्रॅक्टवर जावून धडकली. यावेळी झालेल्या अपघातात विनायक सवाईराम राठोड यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातातील मयत व्यक्तीला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.




















