कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध महाराज यात्रेनिमित्त ८ ते ११ एप्रिल या काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा पंच कमिटीच्या वतीने देण्यात आले.
सोमवारी सकाळी नऊ वाजता पारिजात भजन, रात्री आठ वाजता येन्नीमजल, रात्री नऊ वाजता लहान नंदी कोल काठ्यांचे मिरवणूक होणार आहे.
9 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता श्री गेनसिद्ध महाराजांचा गदगीस महाभिषेक, व महाआरती. रात्री नऊ वाजता मोठ्या नंदी कोल काठ्यांचे भव्य मिरवणूक होणार आहे.
10 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कलगीतुराचे जुगलबंदी कार्यक्रम, सायंकाळी पाच वाजता लहान कुस्त्या होणार आहेत.
11 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या कुस्त्यांचे आयोजन केले आहे त्याचे उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेते उदयशंकर पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री नऊ वाजता शोभेचे दारूकाम, रात्री दहा वाजता श्री शिवयोगी अमोघसिद्ध नाट्यसंघ कुदरीकन्नूर यांचे सुंदर कन्नड पौराणिक नाटक ‘अमोघसिद्ध महात्मे ‘ अर्थात भंडारद महिमा नाटक होणार आहे.
यात्रा काळातील धार्मिक कार्यक्रमाचा कुंभारी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे.