कुंभारी :- ग्रामदैवत गेनसिद्ध महाराजांच्या यात्रेच्या ऐन तीन दिवसा आधीच वळू चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गेनसिद्ध महाराजांच्या भक्तावर आभाळ कोसळले तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आले.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सायंकाळनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबतची माहिती अशी की गेनसिद्ध महाराजांवर अपार श्रद्धा असल्याने परिसरातील भाविक शेतकरी गेनसिद्ध महाराज देवालयास वळू दान देतात. हा वळू कोणाचाही शेतात जाऊन पीक खाल्ल्यास पिकाची भरभराटी येते अशी आख्यायिका आहे. पण अचानकपणे वळूचा मृत्यू झाला. ऐन जत्रेच्या तीन दिवस आधी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली. दरम्यान सायंकाळी गेनसिद्ध महाराजांच्या भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला.