विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लहान मुलांनाही नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या प्रियकरासह दोघांना पोलिसांनी अटक केली. मावळ तालुक्यातील या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गर्भपात करण्यासाठी विवाहिता 5 जुलै रोजी दोन्ही मुलांसमवेत घराबाहेर पडली. आई-वडिलांना तिने अक्कलकोट येथे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात असून, तेथे पोहोचल्यानंतर फोन करते, असे सांगितले. त्यानंतर ती रविकांत गायकवाडसोबत कळंबोली येथे गेली. दिवसभरात तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. घरच्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिसाद दिला नाही. यानंतर सदर धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
विवाहितेच्या मृतदेहासह तिच्या दोन्ही मुलांना घेऊन तो इंद्रायणी नदीजवळ गेला. यानंतर विवाहितेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला. हा सर्व प्रकार दोन चिमुकल्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि मोठ्या रडू लागले. यानंतर दोन्ही मुले रडू लागल्याने त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकून देण्यात आले.
हत्याकांड केल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.
गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 6 जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. यानंतर दोन्ही जिवंत मुलांना देखील नदीत टाकून दिलं.