ज्या घरात मृत्यु झाला, त्याच घरात चोरी करुन चोरट्यांनी हात साफ करुन निर्दयीपणाचा कळसच केल्याचं पहायला मिळालं. घरात आईचा मृत्यु झाल्याने अंत्यसंस्काराची तयारी करीत असतांना चोरट्यांनी सोन्याच्या दागीन्याची चोरी केल्याची घटना रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी 2 वाजेच्या सुमारास निधोना रोडवरील बर्डे वसाहतीमध्ये घडली.
घरात आईचा मृत्यु झाला असतांना घरातील सर्व लोक अंत्यसंस्काराची तयारी करत असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट उघडुन जवळपास दिड ते दोन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने लांबविले. मात्र चांदीचे दागीने तसेच ठेवलल्याचं दिसून आलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथकासह चंदनझिरा पोलीसांनी भेट देवुन पंचनामा केलाय.
चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील निधोना रोडवर असलेल्या बर्डे वसाहतीत शेख मुनीर शेख चांद आणि शेजारीच त्यांंचे अन्य कुंटुबिय राहतात. आज सकाळी शेख मुनीर यांच्या आईचा मृत्यु झाला. त्यामुळे मुनीर सह त्यांचा परिवार आईच्या घरी गेला होता. ईकडे मुनीरच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांने मुनीरच्या घरात घुसुन कपाटातील सामान अस्त व्यस्त फेकत तिजोरीतील दिड ते दोन लाख रुपयाचे सोन्याचे दागीने चोरट्यांने पळविलेत. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चांदीचे दागीने जाग्यावरच सोडले. घटनेची माहीती मिळताच गुन्हे शाखेच्या कर्मचार्यासह चंदनझिरा पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केलाय.




















