आगामी काळात लाडकी बहिण योजनेच्या रकमेत वाढ करुन 2100 रुपये करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्या 2025 च्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी दिली.
लाडक्या बहिणीच्या प्रेमामुळेचे सत्तेवर येता आले. भुतकाळात कधीही ऐवढे मोठ्ठे बहुमत कुणाला मिळाले नाही. त्यामुळे त्याच बहिणीचा सन्मान करण्यासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना येथे येत असून सुमारे 5 हजार लाडक्या बहिणींना फेटे बांधले जाणार आहेत. दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावर 24 किंवा 25 जानेवारीपर्यंत खात्यावर पैसे जमा होतील. अशी माहिती खोतकर यांनी दिली. त्यावर लाडक्या बहिणीला एकविशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी येणार्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतुद केली जाणार असल्याचं म्हटलंय.