जालना शहरातील डबलजीन भागात राहणारा आणि 8 व्या वर्गात शिक्षण घेणार्या आर्यन श्रीकांत घुले या 14 वर्षीय मुलाला एका टोळक्याकडून मारहाण करण्याची आल्याची घटना दि. 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 पोलीस सुत्रांनी दिलीय.
आर्यन श्रीकांत घुले हा अभ्यासासाठी पुस्तक घेण्यासाठी गांधी चमन येथील दुकानात जात असतांना यश किराणा दुकानासमोर गणेश संतोष परळकर व जितु मेहरा रा. डबल जिन जालना हे त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी इसमासह दुचाकीवर आले होते. त्यामधील एकाने पाठीमागुन डोक्यात चापट मारली आणि त्याच्या जवळ गाडी उभा करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे शाळकरी मुलगा ओरडत असतांना गणेश परळकर यांने चाकु काढुन मारुन टाकण्याची धमकी देत आर्यनच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन काढून घेतली. दरम्यान पाच ते सहा मारहाण करीत असतांना त्यातील एकाच्या कमरेला पिस्तुल सारखे हत्यार असल्याचे तक्रारीत म्हटलंय. जिव वाचविण्यासाठी आर्यन ओरडत असतांना मारहाण करणारे पळून गेले. या प्रकणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.