जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिशन हॉस्पीटल परिसरातील शारदाबाई कंपाऊंडमध्ये दलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या दोघांना सदरबाजार पोलीसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून एक धारदार तलवार देखील जप्त केलीय. अशी माहिती रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
जालना शहरातील मिशन हॉस्पिटल परिसरातील शारदाबाई कंपाऊंड मध्ये दोघे इसम हातात तलवार घेवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सदरबाजार पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी नरेश गणेश गोमतीवाले आणि विजय गोमतीवाले या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील तलवार देखील जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी दोघावरही सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.