जालना तालुक्यातील शेवगा येथील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी गावकर्यांनी संबंधीत शिक्षकाला चोप देत मौजपुरी पोलीसांच्या स्वाधीन केलंय.
शेगाव येथील जिल्हा परिषद शाळा ही नियमाप्रमाणे भरलेली असतांना शाळेच्या इंट्रोलच्या वेळी विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर एका विद्यार्थीनीला वर्गात बोलावून तीच्या सोबत अश्लिल चाळे करीत होता. हा प्रकार गेल्या दोन दिवसापूसन सुरु होता. परंतु, आज सदरील विद्यार्थीनीने तीच्या पालकांना हा सर्व प्रकार सांगीतला. त्यामुळे पालकांनी व गावकर्यांनी त्याला आज पकडले असून पोलीसांच्या स्वाधीन केलंय. प्रल्हाण सोनवणे रा. खोडेपुरी, हल्ली मुक्काम चौधरी नगर, मंठा रोड जालना. असे अश्लिल चाळे करणार्या शिक्षकाचे नाव आहे. सध्या तो मौजपुरी पोलीसांच्या ताब्यात असून त्याच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
प्रल्हाद सोनवने याने गेल्या काही वर्षापुर्वी धांडेगाव येथील शिक्षकाला मारहाण केली होती, त्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती. त्या घटनेच्या काही दिवसानंतर त्याचे निरखेडा तांडा येथे देखील विद्यार्थ्याची छेड काढली होती. त्यामुळे त्याची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. त्याची तिथूनही बदली करण्यात आली होती. आज पुन्हा त्याला विद्यार्थीनीची छेड काढली म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतलंय.