जालना शहरातील चंदनझीरा भागात गांजा विक्री करणार्या महिलेवर कारवाई करुन तीच्या ताब्यातून 4 किलो 579 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असल्याची माहिती रविवार दि. 18 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिलीय.
जालना शहरात चंदनझीरा भागातील लहुजी नगर झोपडपट्ठी, एकता नगर येथील पुजा ओमप्रकाश नाईक ही महिला अवैधरित्य गांजा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सदरील ठिकाणी छापा मारुन गांजा जप्त केला. दरम्यान महिला पुजा ओमप्रकाश नाईक हीला देखील ताब्यात घेण्यात आलंय. तीच्या ताब्यातून 91 हजार 580 रुपये किंमतीचा 4 किलो 579 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, रस्तुम जैवाळ, प्रशांत लोखंडे, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, भागवत खरात, धीरज भोसले, सचिन राऊत, गणेश वाघ, कविता काकस, सत्यभामा उबाळे यांनी केलीय.




















