जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून त्याकडे संबंधीत पोलीस अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहेत. हप्ता वसूली करुन हप्ता न दिल्यास कारवाई दाखवितात. मात्र त्यानंतर पुन्हा धंदा सुरुच राहतो असा गंभीर आरोप जालना शहरातील नागरीक दिलीप कारेवी यांनी सोमवार दि. 19 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता केलाय.
मटका नावाच्या जुगार हा मोठ्या प्रमाणात सुरु असून काही दुकानावरुन हप्ते सुरु असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. काही दिवसापुर्वीच एका पोलीस उप निरीक्षकाने एका दुकानावर रेड करुन 52 हजार रुपये हस्तगत केले. परंतु, त्यात केवळ 2 हजार रुपयेच दाखविले आणि 50 हजार रुपये परत केल्याचा आरोपही कोरवी यांनी केलाय. त्यानंतर धंदा सुरळीत सुरु करण्यासाठी 20 हजार रुपये हप्ता सुरु करण्यात आल्याचंही त्यांनी सोशल मिडीयावर टाकलेल्या विडीओमध्ये म्हटलंय. पोलीसावर होत असलेले गंभीर आरोप सर्वसामान्य जनतेला धक्का देणारे आहेत. त्यामुळे अशा पोलीस अधिकार्याची चौकशी करावी आणि सदरबाजार हद्दीत सुरु असलेले धंदे बंद करावेत, त्या विरोधात आवाज उठविणार्यावर हल्ले होत असल्याचेही विडीओमध्ये दिलीप कोरवी यांनी म्हटलंय. या संदर्भात कारसंबधींत अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी मी त्या भागात गेलो नाही, माझा त्या कारवाईशी काही संबंध नाही असे म्हणून केलेले आरोप फेटाळून लावलेत.