जालना जिल्ह्यातील जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन गांजा सह 1 लाख 51 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दि. 29 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. या कारवाईत 3 किलो 839 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय.
बदनापुर गावच्या हद्दीतून बदनापुर ते छत्रपती संभाजीनगर रोडने स्कुटीवर अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व बदनापुर पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन अजय संजय चावरे रा. कसबा गांधीचमन, जुना जालना यास ताब्यात घेतलं. तपासा दरम्यान त्याच्या ताब्यातील स्कुटीच्या डिकीमध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजा आढळून आला. त्यामुळे 3 किलो 839 ग्रॅम गांजा व गुन्हयात वापरलेले होंडा कंपनीची स्कुटी असा एकुण 1 लाख 51 लाख 730 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक अजय जैस्वाल यांच्या तक्रारीवरुन बदनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस उप निरीक्षक जैस्वाल, चौरे यांच्यासह जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खाडे, दिपक घुगे, संभाजी तनपुरे, किशोर पुंगळे, रमेश काळे, सचिन राऊत, सोपान क्षीरसागर, सायंबर, वाघमारे, मोरे, कराड, हुसे, गोलवाल, शेख, तडवी, जाधव यांनी केलीय.