जालना शहरातील अंबड चौफुली ते छत्रपती संभाजीनगर बायपास रोडवर असलेल्या जिल्हा न्यायालयासमोर एका कारची भिषण अपघात झाल्याची घटना दि. 30 मे 2025 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वसमत येथील विजयकुमार यंगडे, विक्रमसिंग केरबा काळे, दशरथ धोंडीबा कदम, शैलेंद्र कतृवार आणि वाहन चालक राजेश पारवे हे वसमत येथून कार क्रमांक एम एच 20 सीएच 0901 या गाडीने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी जालना येथील न्यायालयासमोर आली असता त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने हुलकावनी दिल्याचे वाहनचाकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भिषण अपघात झाला. हा अपघात इतका भयान होता की, गाडीने 3 ते 4 पलट्या मारल्या. त्यात गाडी रस्त्याच्या कडेला असेलल्या नाल्यावर धडकली. कार ही पुर्णपणे उलटी पडली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात 5 जण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.