जालना येथील एसआरपीएसफ ग्रुप 3 मध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 20 मे 2025 रोजी घडली. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या जवानावर आज शवविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती बुधवार दि. 21 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
पुरुषोत्तम खेडेकर असं 28 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. परंतु, एसआरपीएफ मधील काही जवान हे पैशाच्या व्यवहारात अडचणीत आहेत. काहींवर पोलीस केस झाली तर काही जवांनाना मारहाण झाल्याचीही घटना घडलेली आहे. त्यामुळे ही आत्महत्या नेमकी का आणि कशामुळे केली याचा तपास पोलीस करीत आहेत. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील पोलीस वसाहतीत राहणारा 28 वर्षीय एसआरपीएफ जवान पुरुषोत्तम खेडेकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम खेडेकर हे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते, त्यांच्या आत्महत्येमुळे सहकार्यांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.