जालना शहरातील नारायणा ई-टेक्नो स्कूल या खाजगी शाळेच्या शिक्षकाने 14 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार दि. 12 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षकाने विद्यार्थिनीवर दबाव टाकून खाजगी फोटो मिळवून तीचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीवर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय. या घटनेमुळे शहरत खळबळ उडाली आहे.
हा शिक्षक एका वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून या विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान पालकांच्या तक्रारीनुसार जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी शिक्षक विक्की रॉबीनसन शिंदे याला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे.
जालना शहरातील नारायणा ई-टेक्नो स्कूल शाळेमध्ये एक 14 वर्षीय विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांची शाळेतील कौशल्य शिक्षक विक्की रॉबिन्सन शिंदे याच्याशी ओळख झाली. त्यामुळे पीडित विद्यार्थिनींने तिचा मोबाईल क्रमांक शिक्षक विकी शिंदे याला दिला. त्यातूनच शिक्षक विकी शिंदे याने पीडित मुलीसोबत फोन द्वारे संपर्क वाढला. विक्की शिंदे याने मुलीवर दबाव आणून सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेचे खाजगी फोटो मागवले आणि त्याचा गैरवापर करुन नराधम शिक्षक विक्की शिंदे याने पिडीतेवर ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. विकी शिंदे याच्याकडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार आणि अत्याचार वाढत असल्याने पीडीतेने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून कदम जालना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम शिक्षक विक्की शिंदे याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.




















