औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील आक्रमक होऊ लागले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक झाल्याने हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी राजपत्रच काढला नसल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी दावा केला आहे.
नाव बदलण्याच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप ही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत घोटाळा झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला असून शहराचे नाव बदलण्यासाठी मैदानात उतरण्याचा इशारा देखील दिला आहे. सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मतमतांतरे आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थिती असतांना औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यात आले होते. त्यानंतर सत्तेत आलेले शिंदे सरकार यांनी महाविकास आघाडी सरकारने नामांतर केलेला निर्णय रद्द करून पुन्हा नवीन निर्णय घेतला होता. त्याबाबत राज्यातील काही शहरांचे नाव बदलण्यात आले होते, त्यापैकी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते. अनेक ठिकाणी तसा उच्चार केला जातो, अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे लिहिलेले बघायला मिळाले. इतकेच काय महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसवर बघायला मिळाले.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे येत्या काळात नामांतराचा पुन्हा एकदा तापणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत काय भूमिका घेते, जाधव यांची भूमिका पाहता राजपत्र काढले जाते का ? याकडे लक्ष लागून आहे.