जालना – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- औरंगाबाद ( कार्यक्षेत्र – औरंगाबाद, जालना, बुलडाणा) आणि जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या 8 वर्षपूर्ती निमित्ताने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.जालना, दि. 17.12.2022 – केंद्र शासनाच्या 8 वर्षपूर्ती निमित्त “सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण” व गतिशक्ती विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीला आवर्जून भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जालनावासीयांना केले. ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- औरंगाबाद (कार्यक्षेत्र- औरंगाबाद, जालना व बुलडाणा), जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ते 21 डिसेंबर 2022 (05दिवस) पर्यंत जालना रेल्वे स्टेशन एन्ट्री गेट येथे चालणाऱ्या मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी उद्घाटन सोहळ्यात आज दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी बोलत होते.
यावेळी कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता, जालनाचे सहाय्यक आयुक्त, संपत चाटे, जालना रेल्वे स्टेशन प्रबंधक, विनोद कुमार भारती, लीड बँक मॅनेजर, प्रेषित मोघे, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पोस्ट विभागाचे डेव्हलपमेंट ऑफिसर (PLI) श्रीकुमार मुंडे, आरडी पोस्ट एजंट, कल्याण कवडे, पप्पू देशमुख, अर्चना सांगुळे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनाचे जिल्हा कॉर्डिनेटर, मुरलीधर वर्मा, लीड बँक- जनधन योजना प्रसिद्धी इन्चार्ज, कैलास तावडे, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जालनाच्या कार्यालय सहा. अनुराधा बोराडे, धरती धन ग्रामविकास संस्था, जालन्याचे चे अध्यक्ष, मिलिंद सावंत आदींची विशेष उपस्थित होते.
डॉ. विजय राठोड यांनी या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले. जिल्हा परिषद प्रशाला, दानकुंवर महिला महाविद्यालय, आयटीआय, जालनाचे एकुण 500 विद्यार्थ्यांनी उदघाटन कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पंजीकृत मीरा उमप अँड पार्टी, औरंगाबाद तर्फे देशभक्तीपर गीत व शासनाच्या योजनांवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम जयघोषणानी परिसर दणाणला होता. उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्रशाला पासून रैलीचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीत जिल्हा परिषद प्रशाला, दानकुंवर महिला महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालनाचे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर प्रदर्शन 17 ते 21 डिसेंबर, 2022 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनमूल्य सुरू राहणार आहे. चित्रप्रदर्शनात स्पिन 360 डिग्री Virtual Reality, सेल्फी पॉईंट, डिजिटल पझल्स, QR wall, फ्लिपबॉक्स आदी अनुभवायला मिळेल. चित्रप्रदर्शानीच्या ठिकाणी आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, नगर परिषदेचा आधार कार्ड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आधार जोडणी व नवीन नोंदणी, आयुष्मान भारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई सेवा केंद्र आदी स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा, रैली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी मोठ्या भेट देऊन सेवा सुशासन आणि गरीब कल्याण, गतिशक्ती व शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे,जालना यांच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादीगले तसेच धरती धन ग्राम विकास संस्था चे अध्यक्ष मिलिंद सावंत आदिनी परिश्रम घेतले.